। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील आझाद मैदानात गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटचा थरार क्रिडा प्रेमींना पहावायस मिळत आहे. चौथ्या दिवशी शनिवारी (दि.22) दुपारपासून रात्रीपर्यंत सुपर 12 ची लढत झाली. या लढतीमध्ये प्रत्येक संघातील खेळाडूंनी सामना जिंकण्यासाठी प्रयत्न केला. स्पर्धा पाहण्यासाठी मैदानात प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली होती.
प्रेक्षणीय सामना अलिबाग फोटोग्राफर्स आणि अलिबागचे कलाकार यांच्यामध्ये झाला. कलाकार संघाने फोटोग्राफर्स संघाला पराभूत करून विजय मिळविला. त्यानंतर साखळी सामन्याला सुरुवात झाली. सुरुवातीचा सामना रेवदंडा रॉयल्स आणि मापगाव मार्वल्स संघामध्ये झाला. मापगाव संघाने फलंदाजी करीत 45 धावा केल्या होत्या. रेवदंडा संघासमोर विजयासाठी 46 धावांची गरज होती. या संघातील खेळाडूंनी पाच षटकामध्ये 48 धावा करीत विजय मिळविला.
दुसरा सामना कुर्डूस किंग्ज आणि अलिबाग सुपर किंग्ज या संघामध्ये झाला. कुर्डूस किंग्ज संघाने सुरुवातीला फलंदाजी केली. पाच षटकात 3 बाद, 57 धावा केल्या. अलिबाग सुपर संघासमोर विजयासाठी 58 धावांची गरज होती. परंतु, कुर्डूस संघाने अलिबाग संघातील खेळाडूंना रोखत पाच षटकात फक्त 55 धावा दिल्या. त्यामुळे कुर्डूस संघ विजयी झाला.
तिसरा सामना रेवदंडा रॉयल्स् आणि कुर्डूस किंग्ज संघात झाला. रेवदंडा संघातील खेळाडूंनी सुरुवातील फलंदाजी केली. पाच षटकात चार बाद, 57 धावा केल्या. त्यानंतर कुर्डूस संघाने फलंदाजीला सुरुवात केली. मात्र, रेवदंडा संघाने उत्कृष्ट गोलंदाजी व क्षेत्ररक्षण करून कुर्डूस संघाला फक्त 38 धावामध्येच रोखले. त्यामुळे रेवदंडा रॉयल्स संघ विजेता ठरला.
चौथा सामना मापगाव मार्वल्स आणि अलिबाग सुपर किंग्ज यांच्यामध्ये झाला. अलिबाग संघाने 62 धावा केल्या होत्या. मापगाव संघाला विजयासाठी 63 धावा आवश्यक होत्या. मात्र, अलिबाग संघाने मापगाव संघाला फक्त 39 धावा दिल्या. त्यामुळे अलिबाग सुपर किंग्ज संघ विजयी ठरला.
पाचवा सामना कुर्डूस किंग्ज आणि अलिबाग सुपर किंग्जमध्ये झाला. कुर्डूस संघाने पाच षटकात पाच बाद, 31 धावा केल्या होत्या. अलिबाग संघाने नंतर फलंदाजीला सुरुवात केली. पाच षटकात या संघाने 35 धावा करीत विजय मिळविला.
सहावा सामना नांदगाव निंजास आणि थळ टायफुन्स या संघामध्ये झाला. नांदगाव संघाने सुरुवातीपासून जोरदार फटकेबाजी करीत पाच षटकात 56 धावा केल्या. मात्र, पाच खेळाडू बाद झाले. त्यानंतर थळ टायफुन्स संघाने फलंदाजी करण्यास सुरुवात केली. मात्र, थळ टायफुन्स संघाने पाच षटकात फक्त 30 धावा केल्या. त्यामुळे नांदगाव निंजास संघ विजयी झाला.
सातवा सामन्याची लढत उसरोली वंडर्स आणि मुरूड डिफेडर्स संघामध्ये झाली. सुरुवातीला उसरोली संघाने फलंदाजी केली. पाच षटकात 75 धावा या संघाने केल्या होत्या. त्यामुळे मुरूड संघाला विजयासाठी 76 धावांची गरज होती. परंतु, या संघाला उसरोली संघाने पाच षटकात 66 धावा दिल्या. त्यामुळे उसरोली संघ विजयी ठरला.
आठवा सामना रामराज रायडर्स आणि शहापूर स्माशर्स या संघात झाला. रामराज संघाने सुरुवातीला फलंदाजी करीत चार बाद, 40 धावा केल्या. त्यानंतर शहापूर संघाने फलंदाजीला सुरुवात केली. 3.4 षटकात 43 धावा करीत शहापूर संघ विजेता ठरला.
नववा सामना रेवदंडा रॉयल्स आणि वरसोली चॅलेंजर्स या संघामध्ये झाला. रेवदंडा संघाने फलंदाजी केली. पाच षटकात 8 बाद, 35 धावा केल्या. वरसोली संघाने त्यानंतर फलंदाजी करण्यास सुरुवात केली. 3.3 षटकात 43 धावा करीत विजय आपल्याकडे खेचून आणला. या स्पर्धेत वरसोली संघ विजयी झाला.
दहावा सामना बेलोशी बीग बुल्स आणि वळके अव्हेंजन्स संघामध्ये झाला. बेलोशी संघाने पाच षटकात 46 धावा केल्या. वळके संघाला विजयासाठी 47 धावांचे लक्ष होते. परंतु, या संघाला बेलोशी संघाने फक्त 41 धावा दिल्या. त्यामुळे वळके संघ पराभूत होऊन बेलोशी संघ विजयी झाला.
अकरावा सामना अलिबाग सुपर किंग्ज आणि चेंढरे चॅम्पीयन यांच्यामध्ये झाला. पाच षटकामध्ये अलिबाग संघाने आठ बाद, 16 धावा केल्या होत्या. एका षटकाच्या आतच चेंढरे संघाने 17 धावा करन विजय मिळविला.
मध्यरात्रीपर्यंत हे सामने खेळविण्यात आले. क्रिकेटचा हा थरार पाहण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात प्रेक्षकांची अलोट गर्दी झाली होती. प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच, घरबसल्या युट्यूबवरदेखील लाखोच्या संख्येने या स्पर्धा पाहण्याचा आनंद लुटला.