। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील बेलोशीवाडी येथील रा.जि.प. शाळेच्या आंदोशी केंद्राचे प्रमुख कृष्णकुमार शेळके यांच्या मार्गदर्शखाली मुख्याध्यापक बळीराम पाटील, शिक्षक निलेश तुरे यांच्या प्रयत्नाने पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावातील पालकांनी उपस्थित राहून आपल्या पाल्याच्या विविध गुणदर्शनाला प्रोसाहन दिले. या कार्यक्रमाला माजी केंद्रप्रमुख कृष्णा भोपी, शाळेचे माजी शिक्षक शामसुंदर बेलोस्कर, विजय मोरे, मनोज कंटक, मिस्त्रीक, पराग पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, या कार्यक्रमासाठी वेश्वी केंद्राचे केंद्रप्रमुख संजय पोईलकर, भोईर, लीना भोपी, वासंती भोईर, दीपक पाटील, विनायक भोनकर, निलेश वारगे, सचिन कांबळे, बलकवडे आदी मान्यवर उपस्थित होते.