। अलिबाग । प्रतिनिधी ।
तब्बल दोन वर्षानंतर साजर्या झालेल्या अलिबागमधील शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या लाखमोलाच्या दहीहंडीला शुक्रवारी उदंड प्रतिसाद लाभला.
यावेळी माजी आ.पंडित पाटील, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी जि.प.सदस्या भावना पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड बाजारचे अध्यक्ष नृपाल पाटील, माजी उपनगराध्यक्षा अॅड.मानसी म्हात्रे, ज्येष्ठ नेते कबन नाईक, शैला पाटील, अॅड.गौतम पाटील, नंदकुमार मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या दहीहंडी उत्सवासाठी 1 लाख 11 हजार 111 रुपये व चषक असे पहिले बक्षिस ठेवण्यात आले आहे. ते फोडण्यासाठी अलिबाग तालुक्यातील अनेक गोविंदा आणि गोपिकांच्या पथकांनी प्रयत्न केले.संयोजकांच्यावतीने पाच थऱ लावून सलामी देणार्या पुरुष व महिला पथकांना 15 हजार रुपये बक्षीस म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. याशिवाय आकर्षक चित्ररथ स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक 10 हजार रुपये, द्वितीय 7 हजार, तृतीयसाठी 5 हजार रुपये अशीे बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते येणार आहे. ही स्पर्धा अलिबाग शहरापुरतीच मर्यादित होती. तर दहीहंडी स्पर्धा अलिबाग तालुक्यापुरती मर्यादित ठेवण्यात आली होती.