हुजूर साहेब नांदेड ते पनवेल रेल्वेसेवेला कोकणात थांबे द्या

| पनवेल | वार्ताहर |

राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव गृपचे संघटनमंत्री ओमकार माळगांवकर यांनी 17613/17614 हुजुर साहेब नांदेड पनवेल हुजुर साहेब नांदेड ही रेल्वेसेवा रत्नागिरी-सावंतवाडी रोड-थिवीम-करमाळी-मडगाव पर्यंत वाढविण्याची मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय संचार, तंत्रज्ञान, रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय रस्ते सडक महामार्ग राजमार्ग दळणवळण परिवहनमंत्री नितीन गडकरी, मध्य रेल महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी, अध्यक्ष रेल्वे बोर्ड नवी दिल्ली, डी.आर.एम.दक्षिण मध्य रेल यांच्याकडे पोस्टातून रजिस्टर निवेदनाद्वारे केली आहे.

Exit mobile version