। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गुगल या टेक दिग्गज अल्फाबेट कंपनीने आपल्या शेकडो कर्मचार्यांना कामावरुन काढून टाकले आहे. हे सर्व कर्मचारी अँड्रॉइड सॉफ्टवेअर, पिक्सेल स्मार्टफोन आणि क्रोम ब्राउझरसाठी काम करत होते. द इन्फॉर्मेशनच्या हवाल्यानं याबाबतची माहिती समोर आली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने स्वेच्छेने कंपनी सोडण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर कंपनीने आता हा निर्णय घेतला आहे. जानेवारी महिन्यात कंपनीने काही लोकांना युनिटमधून स्वेच्छेने बाहेर पडण्यास सांगितले होते. सुमारे 25,000 कर्मचारी कंपनीत काम करत आहेत. यामधील शेकडो कर्मचार्यांना कामावरुन टाकण्यात आले आहे.
2025 च्या सुरुवातीस, गुगलने आपल्या कर्मचार्यांना लक्ष्य करण्यासाठी एक स्वैच्छिक निर्गमन कार्यक्रम सुरू केला होता. 2024 मध्ये, गुगलचे अॅन्ड्रॉइड आणि हार्डवेअर वरिष्ठ उपाध्यक्ष रिक ऑस्टरलोह यांच्या नेतृत्वाखाली विलीन करण्यात आले. ज्यामुळे उत्पादनांमध्ये वैशिष्ट्ये समाकलित करण्यात आली आहेत. कंपनीचे संपूर्ण ऑपरेशन सुव्यवस्थित करण्यात आले आहे. अंतर्गत बदलांमुळे, आपल्या कर्मचार्यांना पीपल ऑपरेशन्स आणि क्लाउड विभागातून काढून टाकण्याचा विचार करत आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट आयएनसी 2015 मध्ये सुमारे 1,83,323 कर्मचारी कार्यरत होते, जे मागील वर्षाच्या तुलनेत 821 (0.45%) ची वाढले होते.
गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली
2025 च्या चौथ्या तिमाहीत, अल्फाबेटने अपेक्षित महसूल मिळवला नाही. कंपनीला 96.56 अब्ज डॉलर कमाई अपेक्षित होती. तिची कमाई 96.46 बिलियन डॉलर होती. गुगलची जाहिरात कमाई अपेक्षेपेक्षा जास्त 10.47 अब्ज डॉलर होती. तर क्लाउडची कमाई 11.95 अब्ज डॉलर इतकी कमी झाली. एकूणच कंपनीने वार्षिक 12 टक्के महसूल वाढवला आहे. परंतू जाहिरात, शोध, आणि सेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये वर्षभरापूर्वीच्या तिमाहीच्या तुलनेत घसरण झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.