| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. संस्कार सोनटक्के या 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. शेगावच्या संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये तो शिक्षण घेत होता. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संस्कार सोनटक्के हा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये शिकत होता. तो इयत्ता सहावीत होता. संस्कारला उन्हाचा त्रास झाल्याने त्याची तब्येत बिघडली. यानंतर त्याला उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र, वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.