शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल काँग्रेस भवन येथे मालडुंगे ग्रामपंचायतमधील कुंभटेकडी व तारपट्टी या गावातील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी तालुका उपाध्यक्ष रुपेश पाटील, गजानन पाटील व चंदर चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
शैलेश पटणे यांच्या मार्गदर्शनाखाली व रोहन एकनाथ वाघे यांच्या नेतृत्वाखाली मनोज राठे, समीर दळवी, मुकुंद कांबळे, सुशील घमरे, सुशांत घमरे, प्रथमेश चौरासिया व त्यांच्या असंख्य सहकार्यानी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला आहे. तसेच, भाजपच्या मनमानी कारभाराला व पनवेलमधील हुकूमशाही पद्धतीने भाजपमध्ये होणार्या राजकारणाला कंटाळून या भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे कार्यकर्ते काशिनाथ कांबडी यांच्यासह किशन शेंडे, रुपेश चौधरी, दत्तू चौधरी, योगेश सांबरी, शैलेश भुरबडा, रवी हुमने, संजय उघडा, सुनील कांबडी, अंकुश उघडे, जनार्दन संबरी, नरेश कांबडी, भारत सांबरी, बाळ्या सांबरी, किरण सांबरी, हरिश्चंद्र कांबडी, साहिल ढुमने, दिलीप सांबरी, बुध्या चौधरी, नरेश वारगडा, सुरज वारगडा, युवराज चौधरी, गौरव चौधरी, उमेश सांबरी, सीताराम कांबडी, गौरव कांबडी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, तालुका अध्यक्ष नंदराज मुंगजी व जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी महिला काँग्रेस अध्यक्षा निर्मला म्हात्रे, शशिकांत बांदोडकर, जयवंत देशमुख, शहर अध्यक्ष लतीफ शेख, सुधीर मोरे, अनुसूचित विभाग अध्यक्ष सागर पगारे, बगाराम रोडपालकर, सुनील पाटील, राहुल जानोरकर, आदम ढलाईत, प्रीतेश साहू, चेतन म्हात्रे, मर्फी म्हसकर, शैलेंद्र पाटील, शाहीद मुल्ला, सागर म्हात्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.