कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश
| महाड | प्रतिनिधी |
महाडमधील विन्हेरे विभागातील कोंडमालुसरे येथील म्हसकर भावकीमधील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला रामराम ठोकत शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे करंजाडी जिल्हा परिषद मतदार संघामध्ये ठाकरे गटाची ताकद अधिक वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सरपंच तथा उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत म्हसकर भावकीमधील नागरिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सोमनाथ ओझर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश करत असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना ओझर्डे यांनी, महाड मधील विन्हेरे विभागात येत्या काळात मोठ्या जोमाने अधिकाधिक पक्षप्रवेश शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षात होणार असल्याचे सांगितले. या पक्षप्रवेश सोहळ्याला सोमनाथ ओझर्डे यांच्या सह तुकाराम खेडेकर संपर्क प्रमुख विन्हेरे विभाग, महेंद्र जोगळे विभाग प्रमुख, अरुण आंग्रे उपविभाग प्रमुख, सुशील सावंत शाखा प्रमुख, गणेश आंग्रे शाखा प्रमुख, भरत मोरे उपशाखा प्रमुख आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
