छबिना उत्सवाची शेकडो वर्षाची परंपरा कायम

तरुणांचा उत्साह शिगेला

| महाड । वार्ताहर ।

महाड तालुक्याचे आराध्यदैवत असलेल्या श्री विरेश्‍वर महाराजांचा छबिना उत्सव मंगळवारी (दि. 21) रात्री गर्दीच्या महापुरात उत्सव साजरा होणार आहे. शेकडो वर्षाची परंपरा अबाधित असली तरी तरुणांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.


श्री वीरेश्‍वर मंदिराचे महत्त्व शिवकालापासून असल्याने महाड आणि पोलादपूर तालुक्यांचे प्रमुख देवस्थान या देवालयाची ओळख आहे. महापूजेचा मान पोतनीस घराण्याकडे आहे. या घराण्याचे वंशज बिपीन पोतनीस दरवर्षी उत्सवामध्ये सहभागी होतात. त्यांच्या हस्ते श्री वीरेश्‍वर महाराजांची महापूजा केली जाते लाखो भाविकांचे आगमन शहरामध्ये होत असल्याने यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी रायगड पोलिसांकडून विषेश दक्षता घेतली जाते.

दि. 21 च्या रात्री नाते रवळनाथ याची पालखीचे आगमन होते. यानंतर तालुक्यातील सव, गोठे, दासगाव, चोचिंदे या गावांतील देवदेवतांच्या पालख्यांचे आगमन छबिन्याच्या रात्री उत्साही वातावरणामध्ये होते. मात्र या उत्सवामध्ये विन्हेरची श्री झोलाईदेवीचा मान मोठा असतो. या देवीची पालखी विन्हेरे गावातून पायी येत भोईघाट येथे विरेश्‍वर पंच कमिटी सह भोई समाजातर्फे पालखीचे स्वागत करण्यात येते. पायघड्या टाकून पालखीची मिरवणूक काढली जाते. पालखी स्थानापन्न झाल्यानंतर खणानारळाने ओटी भरली जाते. गावातील महिलांकडून विधिवत पूजन केले जाते. ही परंपरा शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे.

मध्यरात्री विरेश्‍वर देवस्थानच्या आवारात देव दैवतांचा गोंधळ घालण्यात येतो. या वेळी दिवटी पेटविण्यात येऊन भंडारा उधळण्यात येतो. या नंतर रात्र पालख्या व सासन काठी नाचविण्यात येतात. दि. 22 च्या सकाळी लळित कीर्तनाने उत्सवाची सांगता होते.

Exit mobile version