| अलिबाग | प्रतिनिधी |
वहिवाट असलेल्या रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी मापगावमधील सुरेश मापगांवकर यांनी शुक्रवारी 15 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरु राहणार असल्याचे त्यांनी निवेदनाद्वारे सांगितले.
आपल्या बाजूला राहणारे महेश कुंभार यांनी वहिवाट असलेल्या रस्त्यावर विटांचे बांधकाम करून रस्ता बंद केल्याचा मापगांवकर यांचा आरोप आहे. याबाबत ते वर्षभरापासून मापगाव ग्रामपंचायतीकडे न्याय मागत आहेत. कुंभार यांनी त्याच्या मालकीच्या जागेत बांधकाम केल्याचा अहवाल वरिष्ठांना दिला आहे. मात्र ही दिशाभूल करीत असल्याचा आरोप मापगांवकर यांनी केला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी शुक्रवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. उपोषण करताना काही बरेवाईट झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनातून दिला आहे.