| तळा | वार्ताहर |
पंचायत समिती तळा शिक्षण विभागातर्पे गो. म. वेदक विद्यामंदिर येथे तालुकास्तरीय पाककृती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्य युक्त आहाराची सवय लावणे आवश्यक आहे याकरिता तृणधान्यापासून निर्मित विविध पाककृतींचा समावेश दैनंदिन आहारामध्ये केल्यास मुलांना वेगळेपणा मिळेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. तालुका स्तरीय पाककृती स्पर्धेत विजया साबळे प्रथम, अर्चना पवार द्वितीय, रतिका जाधव तृतीय तर स्मिता भगत व जागृती पांचाळ यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले आहे. कार्यक्रमाचे निवेदन प्रा. पाटील एन सी यांनी केले. याप्रसंगी तहसीलदार स्वाती पाटील, गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट, विठ्ठल जोशी, चंद्रकांत रोडे, पुरुषोत्तम मुळे, मंगेश देशमुख, महेंद्र कजबजे, दरबारसिंग साळुंके, दिपक ठाकुर, युगंधरा साबळे, आदिती भायदे, आदी मान्यवर उपस्थित होते.