| पनवेल | प्रतिनिधी |
इतर परपुरुषांसोबत संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर चाकूने वार करुन तिला जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जखमी महिलेच्या पतीला दारू व गांजाचे व्यसन आहे. त्यातून त्यांच्यात नेहमी वाद होत होते. तिचा पती घरी आल्यानंत त्याने तिचे इतर परपुरुषांसोबत संबंध असल्याचे बोलत तिच्या छाती व डाव्या हातावर चाकूने वार करून तिला जखमी करुन तेथून पलायन केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीला पनवेल येथील एक रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरु असल्याचे पनवेल तालुका पोलिसांनी सांगितले.







