हुतात्मा नाग्या महादू कातकरी भवन चळवळीचे केंद्रबिंदू ठरेल

माजी आ.धैर्यशील यांचे प्रतिपादन
परळीत उदघाटन सोहळा, मान्यवरांची उपस्थिती
पाली/बेणसे | प्रतिनिधी |
परळीत सर्वांगसुंदर असे हुतात्मा नागु कातकरी समाज भवन साकारले आहे. भविष्यात हे समाजभवन सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्याचे व चळवळीचे केंद्रबिंदू ठरेल, असे प्रतिपादन माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी केले.
सुधागड तालुका आदिवासी समाजातर्फे परळी येथे हुतात्मा नाग्या महादू कातकरी भवनाचा भव्य उदघाटन सोहळा मंगळवारी (दि.7 डिसेंबर) आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते.
यावेळी उद्योजक डॉ संजय सोनावणे, परळी सरपंच संदेश कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत या भवनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी संकल्पित वाचनालयासाठी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक डॉ संजय सोनावणे यांनी 1 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी मान्यवरांना वृक्ष (रोपटे)व शाल,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
माजी आमदार धैर्यशील पाटील व शेकाप नेते सुरेश खैरे यांच्या प्रयत्नाने डोंगरी विकास कार्यक्रम 4 अंतर्गत आदिवासी सामाजिक सभागृहासाठी 4 लाख 95 हजार 152 इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. तसेच परळी सरपंच संदेश कुंभार व सर्व सहकारी यांनी भवनासाठी चार गुंठे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले.

कार्यक्रमाला शासकीय अधिकारी आले नाहीत याबद्दल मी नाराजी व्यक्त करीत आहे. आदिवासींचा कार्यक्रम आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे अयोग्य आहे.त्यांच्याकडून आदिवासींचे प्रश्‍न सोडविले पाहिजे, मी आमदार असो नसो आपल्या प्रश्‍नांशी मी कायम बांधील आहे,
धैर्यशील पाटील, माजी आमदार

यावेळी ह भ प महेश पोंगडे महाराज, रमेश पवार यावेळी ऍड: प्रवीण कुंभार , सुनिल गायकवाड, दिलीप जाधव, यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन शरद गोळे यांनी केले. या कार्यक्रमास प जांभूळपाडा सरपंच श्रद्धा कानडे, दहीगाव सरपंच सुषमा देशमुख, रमेश देशमुख, हातोंड सरपंच आशा पाठारे, नवघर सरपंच स्वाती कदम, ऍड प्रवीण कुंभार, विठ्ठल सिंदकर, दिलीप जाधव, प्रकाश आवसकर, अमोल देसाई, राजेश नाना गायकवाड, बशीरभाई परबळकर, शरद बोडके, पिठू डुमना आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version