वालचंद ओसवाल यांचे प्रतिपादन
। वावोशी । वार्ताहर ।
अवघे 20 वर्षे जीवन जगलेला नाग्या महादू कातकरी यांचा इतिहास हा प्रेरणादायी व ऊर्जा देणारा आहे. आपल्या न्याय हक्कासाठी प्रत्येक आदिवासी बांधवांसाठी व पर्यायाने देशासाठी आपले बलिदान अर्पण करणारा हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले याचा आम्हाला अभिमान आहे. तसेच, ग्रामपंचायत कार्यालयातील ही प्रतिमा नेहमीच आम्हाला प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन वावोशीचे माजी सरपंच वालचंद ओसवाल यांनी केले. ते हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपले मनोगत व्यक्त करीत असताना बोलत होते.
यावेळी या कार्यक्रमाचे औचीत्य साधत वावोशी ग्रामपंचायत प्रशासनाकडून आदिवासी बांधवांना लग्न मंडपाचे साहित्य व खुर्च्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच आश्विनी शहासने, माजी सरपंच राजू शहासने, उपसरपंच दीपा शिर्के, खालापूर आदिवासी भवनचे अध्यक्ष अनंता पवार, नागेश पाटील, जतिन मोरे, दिलीप डाके, अंकुश वाघ, बबन वाघमारे, एकनाथ पवार, सखाराम वाघमारे, कैलास पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.