। उरण । वार्ताहर ।
कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने नागरी संरक्षण दल यांच्या सहकार्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसाचे पूर्ण वेळ नागरी संरक्षण प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य के.ए. शामा यांच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षित व सक्षम बनविण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शशिकांत सिरसाठ व हरेश्वर ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना आपत्तीचे प्रकार, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती, आपत्तीच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी व आपली जबाबदारी इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. तसेच, दोरीच्या विविध गाठी व त्याचे उपयोग, आपत्कालीन परिस्थितीत विमोचन करण्याच्या पद्धती, कृत्रिम शोषण पद्धती, आपातकाळात स्वसंरक्षण इत्यादी विषयी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले.