मी गोलंदाजीसाठी उत्सुक: श्रेयस

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

मी भारतासाठी गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहे, असे मत फलंदाज श्रेयस अय्यर याने व्यक्त केले. गोलंदाजी न करण्याचे कारणही त्याने सांगितले. या वर्षाच्या सुरुवातीला या खेळाडूच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यामुळे त्याला दीर्घकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. मात्र, आता तो पूर्णपणे तंदुरस्त, असून त्याला गोलंदाजी करायला आवडेल, असे तो म्हणाला.
अय्यरने सांगितले की, दुखापतींमुळे एनसीएमधील प्रशिक्षकांनी त्याला गोलंदाजी करण्याची परवानगी दिली नाही. तो म्हणाला, मी गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक होतो, परंतु फिजिओ आणि एनसीए प्रशिक्षकाचे म्हणणे योग्य आहे की, तुम्ही आता काही काळ गोलंदाजी करू शकणार नाही. श्रेयसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ 7.3 षटके टाकली असून त्यात 43 धावा दिल्या आहेत. मात्र, त्याला अद्याप एकही विकेट मिळालेली नाही. श्रेयसने प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी-20 क्रिकेटमध्ये 10 गडी बाद केले आहेत.

Exit mobile version