मी छत्रपती शिवाजी महाराज होणार

नेरळमध्ये रंगले बालनाट्य

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मी छत्रपती शिवाजी महाराज होणार या बालनाट्याचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बालनाट्यातील शिवाजी महाराज यांना पाहण्यासाठी नेरळ मधील विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.

पनवेल येथील लेखक विजय पवार यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले बालनाट्य पाहण्यासाठी नेरळ गावातील विद्यार्थ्यांची मोठी गर्दी केली होती. या कार्यक्रमात सोहळ्यासाठी आर्थिक साहाय्य करणार्‍या दात्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच याच कार्यक्रमात सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ला येथून 230 किलोमीटर शिवज्योत नेरळ येथे धावत आणणारे तरुण यांचं सत्कार करण्यात आला.

त्यावेळी बालनाट्याच्या मध्यंतर प्रसंगी शिवजंयती उत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या चित्रकला आणि रंगावली स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली. चित्रकला स्पर्धेत अकील तांबोळी याने प्रथम, दुसरा- विकी साळुंखे तर तिसरा क्रमांक- प्रथम वझरकर आणि उत्तेजनार्थ पारितोषिक मनस्वी अहिर हिला देण्यात आले. रंगावली स्पर्धेत निलेश ठोंबरे यांची रांगोळी उत्कृष्ट ठरली. तर श्रुती गुप्ता हिचा दुसरा आणि स्पृहा सावंत हिची रांगोळी तिसरी ठरली.

सर्व विजेत्यांना अध्यक्ष संतोष सारंग, प्रीतम गोरी, अविनाश चंचे, सुमित क्षीरसागर, मंगेश मगर, प्रतीक भिसे, यतीन यादव, बंडू क्षीरसागर, राहुल भाटकर, कस्तुभ गावकर, चिराग गुप्ता, अल्पेश मनवे, सुरज साळवी आणि भावेश व्यास आदींच्या हस्ते करण्यात आले.

Exit mobile version