। नेरळ । वार्ताहर ।
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेमध्ये अभिवादन करण्यात आले. माथेरान शहरातील माधवजी गार्डनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असून त्या ठिकाणी पालिकेच्या वतीने पालिकेच्या मुख्याधिकारी आणि प्रशासक सुरेखा भणगे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच नगरपरिषद कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्ध पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.