| अलिबाग | विशेष प्रतिनिधी | मुरूड तालुक्यातील बोर्ली मांडला विभागात झालेल्या पूरग्रस्त परिस्थिती मुळे नागरिकांचे नुकसान मोठया प्रमाणात झाले आहे त्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी शासनाकडे मागणी करणार असल्याचे माजी आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील यांनी बोर्ली येथे केले आहे.पंडित पाटील यांनी पुढे सांगितले की,शासनाने गेल्या सात वर्षांमध्ये एकही नवीन पुलाला मंजुरी देण्यात आलेली नाही.रायगड जिल्हयात या असणारे पूल हे जीर्ण झालेले आहेत.या पुलावरून बोर्ली मांडला परिसरात असणाऱ्या दगड मातीच्या खाणी आहेत.या खाणी मधून मटेरियल घेऊन जाणारे दहा चाकी वाहने या जीर्ण पुलावरून जात आहेत. ह्या पुलाची क्षमता संपत आली असताना अवजड वाहने गेली तर पूल टिकणार कशा ?असाही सवाल पंडित पाटील यांनी केला आहे.महापूर व अतिवृष्टीने नुकसानीचे पंचनामे त्वरीत करुन शेतकरी व नागरिकांना नुकसान भरपाई मिळावी.पाण्याखाली शेती बुडाली आहेत. त्यामुळे शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिथे तिथे भराव होत असल्याने पावसाचे पाणी अडले जात आहे याला जबाबदार कोण?असेही माजी आमदार पाटील यांनी सांगितले आहे.बोर्ली मांडला विभागातील अनेक घरांमध्ये महापुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेकाचे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन शेतकरी व नागरिकांना त्वरीत नुकसान भरपाई मिळणेबाबत कार्यवाही व्हावी अशी सूचना यावेळी पाटील यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासमवेत बोर्ली सरपंच चेतन जावसेन,चक्रधर ठाकूर,मन्या भोपी,रिझवान फ़ईम,सुरेश नांदगावकर,चेतन चुनेकर, बोर्ली उपसरपंच मतीन सौदागर आदि उपस्थित होते.