खरोशी । वार्ताहर ।
जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी गेले अनेक वर्ष शिक्षण बांधव आपापल्या परीनं लढा देत आहेत त्या लढ्याला यश येत नाही मात्र लवकरच मंत्रालयात शिक्षण सचिव व शिक्षक आमदार यांच्यासमोर मीटिंग होऊन राज्यातील शिक्षक बांधवांना जुनी पेन्शन योजना 100 टक्के मिळवून देण्यासाठी नक्की प्रयत्न करणार व या सार्या घटकाला योग्य न्याय देणार यात शंकाच नाही असे ठाम प्रतिपादन शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी येथे शिक्षक व मुख्याध्यापक यांच्या सहविचार सभेत बोलताना सांगितले.
सातव्या वेतन आयोगाचे हप्ते, पीएफचे बिल मेडिकल बिल, निवृत्ती धारकांची बिले यासह शिक्षकांचे प्रश्न आणि जुनी पेन्शन योजना या समस्यांचे निराकरण करण्यासाठी 20 जानेवारीला मंत्रालयात शिक्षण सचिव व शिक्षक आमदारांसोबत विशेष बैठक घेऊन या विषयी सकारात्मक येईल यात शंकाच नाही रायगड जिल्हा परिषदेतील विविध प्रश्न व शिक्षकांचे प्रश्न सुटावेत यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या समवेत 13जानेवारी रोजी बैठक घेऊन त्या बैठकीसाठी शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक ,कार्यालय अधीक्षक व इतर संबंधित अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन शिक्षकांचे विविध प्रश्न व समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांचे प्रश्न , पीएफ काढण्याचे काम, निवृत्ती वेतनाचे काम अगर शाळेसंबंधी कोणतेही काम असुदे कोणत्याही अधिकारी वर्गाला व कार्यालयीन कर्मचार्यांना लाच अथवा चिरीमिरी देणार नाही अशी शिक्षक बांधवांनी एकच शपथ घ्या यासाठी मी शिक्षक आमदार म्हणून नक्कीच शिक्षकांना न्याय देण्याचे काम करणार आहे. पेण तालुक्याला आज पर्यंत शिक्षक आमदार मधून 30 लाखाचा निधी मिळाला असून रायगड जिल्ह्यासाठी खा. रामदास आठवले , खा. काकडे ,खा. छत्रपती संभाजी महाराज, शेकाप आमदार जयंत पाटील, आमदार अमोल कांबळे या आमदार व खासदारांनी रायगड जिल्ह्यातील दुर्गम शाळांना निधी देण्याच्या कामासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचं आश्वासित केले आहे.
शिक्षक आ. पाटील यांच्या समवेत सार्वजनिक विद्यामंदिर पेण येथे पेण तालुक्यातील माध्यमिक शाळा मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची विशेष सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी आ. धैर्यशील पाटील, पि. डी. पाटील, एम.एन. पाटील यांच्यासह तालुक्यातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.