यशस्वीने बाबरला टाकले मागे
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयसीसीने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली असून यशस्वी जयस्वालला जबरदस्त फायदा झाला आहे. तर पाकिस्तानच्या बाबर आझमचं मोठं नुकसान झालं आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात बाबर आझमची बॅट काही चालली नाही. पहिल्या डावात तर शून्यावर बाद होण्याची वेळ आली होती. त्याचा परिणाम कसोटी क्रमवारीवर झाला आहे. बाबर आझम आधी सहाव्या क्रमांकावर होता. मात्र आता त्याची थेट नवव्या स्थानावर घसरण झाली आहे.
मागच्या आठवड्यात बाबर आझम तिसर्या स्थानावर होता. मात्र आता टॉप 10 मधून बाहेर जाण्याची स्थिती आली आहे. दुसरीकडे, टॉप 10 मध्ये तीन भारतीयांची वर्णी लागली आहे. त्यात यशस्वी जयस्वालला फायदा झाला आहे. नवव्या स्थानावरून थेट सातव्या स्थानी झेप घेतली आहे. तर विराट कोहली आठव्या स्थानावर आहे. सहाव्या स्थानावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. इंग्लंडचा जो रूट 881 गुणांसह पहिल्या, न्यूझीलंडचा केन विल्यमसन 859 गुणांसह दुसर्या, न्यूझीलंडचा डेरिल मिचेल 768 गुणांसह तिसर्या, हॅरी ब्रूक 758 गुणांसह चौथ्या, स्टीव्ह स्मिथ 757 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 751 गुणांसह सहाव्या, यशस्वी जयस्वाल 740 गुणांसह सातव्या, विराट कोहली 737 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. पाकिस्तानच्या बाबर आझमला मोठा फटका बसला असून गेल्या आठवड्यापासून आतापर्यंत 6 क्रमांकाने घसरला आहे. 734 गुणांसह तो नवव्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा 728 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. मोहम्मद रिझवानही 728 गुणांसह संयुक्तरित्या दहाव्या स्थानी आहे.
मोहम्मद रिझवान हा पाकिस्तानचा पहिला विकेटकीपर असून आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये टॉप 10मध्ये आला आहे.दुसरीकडे, आयसीसी क्रमवारीत पाकिस्तानच्या शाहीन शाह अफ्रिदिला मोठा धक्का बसला आहे. शाहीन अफ्रिदीची आठव्या स्थानावरून दहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर भारताचे तीन गोलंदाज टॉप 10 मध्ये आहेत. यात आर अश्विन एक नंबरला आहे. तर जोश हेझलवूड आणि जसप्रीत बुमराह दुसर्या स्थानावर आहेत.
रवींद्र जडेजा सातव्या स्थानावर आहे. दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिका ही विजय टक्केवारीवर अवलंबून असते. यात भारत पहिल्या, तर ऑस्ट्रेलिया दुसर्या स्थानावर आहे. आगामी होणार्या सामन्यांमध्ये सर्वच खेळाडू हे चांगला खेळ करुन आपापली क्रमवारी सुधारण्याचा प्रयत्न करतील, असे दिसते.