बारशाची जबाबदारी चाहत्यांवर
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयसीसीने गुरूग्राम येथील एका कार्यक्रमात भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या शुभंकरचे अनावरण केले. यावेळी 19 वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय महिला आणि पुरूष संघाचे कर्णधार शफाली वर्मा आणि यश धूल हे देखील उपस्थित होते. आयसीसीनुसार नाव न ठेवलेला पुरूष आणि महिला शुभंकर हा स्त्री पुरूष समानतेचं प्रतिक आहे.
आम्हाला आयसीसी पुरूष विश्वचषक 2023 चा आयसीसी शुभंकराचे अनावरण करताना अत्यानंद होत आहे. महा शुभंकर हा संस्कृती आणि सीमांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र करण्याचं काम करणाऱ्या क्रिकेटचं उत्तम प्रतिक आहे. हा शुभंकर दोन्ही स्त्री आणि पुरूषांचे प्रतिनिधित्व करत आहे. हा जगात स्त्री – पुरूष समानतेचा संदेश देत आहे.
ख्रिस टेट्ले ,आयसीसीचे इव्हेंट हेड
आयसीसीने शुभंकर अनावरण कार्यक्रमावेळीच या शुभंकरला नाव देण्यासाठी एका स्पर्धेची देखील घोषणा केली. ही स्पर्धा 27 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. चाहत्यांना या शुभंकरला नाव देत विश्वचषकावर आपली छाप पाडण्याची संधी देखील आहे.असे ते म्हणाले.