| तळा | वार्ताहर |
चरई आदीवासी वाडी येथे कार्यरत असलेले जगदिश हिंरु कासे यांना सन 2023 चा रा.जि.प. शिक्षण विभागाचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. तालुक्यातील 20 वर्ष सेवा झाली असून मांदाड, वाशी महागांव, बहुलेवाडी अशा ग्रामीण भागातील विद्यार्थी पालक यांना प्राथमीक शाळेतून मिळणाऱ्या सोयी सवलती, शैक्षणीक दर्जा, शालेय उपक्रमाची जनजागृती करून पालकांचा ओढा प्राथमिक शाळेकडे येण्यासाठी प्रयत्न केले आहेत.