विद्या घरत यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

| खरोशी | वार्ताहर |

पेण एज्युकेशन सोसायटीच्या वावोशी येथील शाळेत गेली 25 वर्षे विद्या ज्ञानाचे पवित्र काम करणार्‍या विद्या धनाजी घरत यांच्या विशेष कार्याची दखल घेऊन बापूसाहेब नेने फाऊंडेशनच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख 2500 रूपये देऊन आदर्श शिक्षिका पुरस्काराने समाजसेविका शुभांगी नेने यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज पुणे येथील संस्थापक सदस्य श्रीकांत कल्लूरकर सोबती संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब नेने, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा बापूसाहेब नेने फाऊंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. मंगेश नेने, फाऊंडेशनच्या सचिव अ‍ॅड. नीता कदम, संस्थेचे सचिव सुधीर जोशी, शुभांगी नेने, संस्थेचे माजी कार्याध्यक्ष वसंत आठवले, पेण नपाच्या माजी उपनगराध्यक्षा वैशाली कडू आदींसह विविध मान्ययव उपस्थित होते.

Exit mobile version