आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

जिल्ह्यातील 16 शिक्षकांचा होणार गौरव

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी|

रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील 15 शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच एक विशेष शिक्षक पुरस्कारही देण्यात येणार आहे. हा सोहळा गुरुवारी (दि.10) सप्टेंबर रोजी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाट्यगृह येथे होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्‌‍‍ यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी दहा सप्टेंबरला होणारा हा आदर्श पुरस्कार अलिबाग तालुक्यातील सुगंधा पाटील (राजिप शाळा वाडगाव), पेणमधील रामकृष्ण भोईर (राजिप शाळा मायणी कोयना), पनवेलमधील विभावरी सिंगासने (तळोजे पाचनंद), कर्जतमधील राजेश मेचकर (राजिप शाळा मार्गाची शाळा), खालापूरमधील रुपाली पाटील (राजिप शाळा मोहोपाडा), उरणमधील शर्मिला गावंड (राजिप शाळा नवीन शेवे), सुधागडमधील स्मिता जगताप (राजिप शाळा रासळ आदिवासीवाडी), रोहामधील अमिता बामणे (राजिप शाळा रोठ खुर्द), महाडमधील संजय कोंडविलकर (राजिप शाळा कांबळे तर्फे महाड), श्रीवर्धनमधील मनोज माळवदे (राजिप शाळा बापवन), म्हसळामधील महादेव पवार (राजिप शाळा तुरूंबाडी), पोलादपूरमधील संगिता नगरकर (राजिप शाळा चांभारगणी खुर्द), माणगावमधील सरफराज कोंडविलकर (राजिप उर्दु शाळा टेमपाले), तळामधील धर्मा राणे (राजिप शाळा मालाठेवाडी),  मुरूड तालुक्यातील महेंद्र सातामकर (राजिप शाळा साळाव) यांना जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा केळवणेचे उपशिक्षक कुमार पाटील यांना विशेष शिक्षक पुरस्कार (कला) जाहीर करण्यात आला आहे.

Exit mobile version