। अलिबाग । शहर वार्ताहर ।
महनीय व्यक्ंतीचे आदर्श हे फक्त प्रतिमेतच पाहायचे नसतात, तर ते अंगीकारून आपले जीवन आदर्शवत बनविण्याचा प्रयत्न करायचा असतो, असे प्रतिपादन को.ए.सो.जा.र.कन्या शाळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वंदना आंब्रे यांनी केले आहे. सावित्रीबाई फुले जयंती तथा महिला मुक्ती दिनानिमित्त नेहरु युवा केंद्र संघटन, रायगड-अलिबाग आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा संचालित स्पर्धा विश्व अकॅडमीच्या अभ्यासिकेत आयोजित करण्यात आलेल्या एक पाऊल स्वयंसिद्धत्वाकडे या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.याप्रसंगी निशांत रौतेला, प्रतिक कोळी, तपस्वी गोेंधळी,अनुजा पाटील,सुचिता साळवी, यज्ञेश पाटील हे मान्यवर उपस्थित होते.






