पेणच्या मूर्ती उरणमध्ये दाखल

| उरण | वार्ताहर |
पेणमधील सुप्रसिध्द गणेश मूर्ती उरण बाजारात दाखल झाल्या आहे. लंबोदर कला केंद्र,गणेश कला केंद्र,सिद्धिविनायक कला केंद्र . विनायक कला केंद्र अश्या गणेशाच्या नावाने उरण बाजारात गणेश मूर्ती विकावयास आल्या आहेत.

गणेशमूतीवर विविध प्रकारची रंगसंगती आणि डिझाईन ज्यावेळी मूर्तिकार काढती यावेळी त्या मूर्तीला खन्या अथनि गळाच साज चढतो, या योग्य रंगसंगती आणि डोळ्यांच्या आखणी मिळे पेणच्या गणपतींना विशेष मागणी आहे. या रंगसंगतीवर आकर्षित होउन गणेशभक्त पेणचेच गणपती विकत घेण्यासाठी आग्रह धरत आहेत. त्यातच आता गणेशमूर्तीला परिधान करण्यात येणार्‍या खर्‍या , शेला फेटा आणि ज्वेलरीवर गणेशभक्त आकर्षित होत आहेत. किमतीपेक्षा भक्तीला महत्त्व जास्त देऊन आणि अधिकचे पैसे खर्च करून हे गणेशभक्त अशा प्रकारच्या खर्‍या खुर्‍या फेटा, शेला, धीतर, हिरे, मोती परिधान केलेल्या मूर्तीची मागणी करत आहेत.

बाप्पा आपल्याला आयुष्यभर मनापासून जे मांगेल ते देत असतो, त्याची आपण मनोभावे पूजा अर्चा करत असतो, त्याच बाप्पाचे आगमन वर्षातून एकदा आपल्या घरी होत असेल तर त्यासाठी खर्चाचा विचार न करता आम्ही अधिकाधिक सुबक देखणी मूर्तीची मागणी मूर्तीकाराकडे करत असतो. मूर्तिकाराने बनवलेली आणि खरे हिरेजडित मुकुट तयार केलेल्या मूर्तीला आम्ही अधिकाधिक पसंत करतो

ग्राहक – सूरदास धांडे


उरण शहरातील राजपाल नाका येथील गेली 60 वर्षे पूर्वीचे सिद्धिविनायक कला केंद्र असून या केंद्रात मुरीकर गणेश मूर्ती सजावट कामात मग्न झाले आहेत .त्यात शैलेश शेट्ये ,अक्षया पाटील हे गुर्तीला दागिने लाऊन सजवण्याचे काम करीत आहेत असे जगे सिद्धिविनायक कला केंद्राच्या कविता जगे यांनी सांगितले

यापूर्वी आम्ही रंगकामा केलेल्या मूर्ती विकायचो परंतु आता आम्ही दागिने: धातर, शेता. फटा आदी गोष्टी करायची मात्र हळूहळू आपल्या कलेला वाव देऊन बजारातून हिरे .पाचू . खरेदी करून आणि नोवेल्टीमधुन तरी खरेदी करून हिरे आणून ही बाप्पाची मूर्ती अधिक आणि देखणी करण्याचा प्रयत्न केला. आहे तो एवढा यशस्वी झाला की आता आमचे ग्राहक गणेशभक्त अशा प्रकारच्या मूर्तीची मागणी करू लागले आहेत

– कविता जगे – जगे सिद्धी विनायक कला केंद्र उरण



Exit mobile version