शेकापच करणार विकास: चित्रलेखा पाटील

आई करंजाई महिला नाच मंडळास नृत्य साहित्य लोकार्पण

। चणेरा । प्रतिनिधी ।

आपली संस्कृती हा आपला आत्मा आहे. गावोगावी महिला ही संस्कृती जपतात. महिलांना कलाक्षेत्रातील लागणारी कोणतीही गोष्ट मी कधी नाही म्हणत नाही. माणुसकी हाच आमचा धर्म आहे आणि त्याचे पालन करुनच मी पुढे जाईन. गावातील विकासकामे करायची असतील तर शेकापक्षाशिवाय पर्याय नाही, असे चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई म्हणाल्या.

शेडसई येथील आई करंजाई महिला नाच मंडळास नृत्यासाठी लागणारे ढोलकी, झांज, स्पिकर मशिन, स्पिकर, माईक व इतर साहित्य शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी स्वखर्चाने दिले. याआधी गावात मोफत चष्मे, विद्यार्थ्यांनींना सायकल वाटप त्याप्रमाणे गरजूंना आर्थिक मदत चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताईंनी केल्याने ग्रामस्थांनी आभार मानले. काही कारणाने आम्ही बांधलेल्या पीएनपी नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी आले, ते पुन्हा बांधून तयार झाल्यावर तुम्हाला नाचण्यासाठी आवर्जून आमंत्रण देणार आहे, असे चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई म्हणाल्या.

यावेळी सरपंच कल्याणी मढवी, उपसरपंच राजेश्री पाटील, मजदूर फेडरेशनचे अध्यक्ष हेमंत ठाकूर, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन गोपीनाथ गंभे, उपचेअरमन विकास भायतांडेल, कार्यालयीन चिटणीस संदेश विचारे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनायक, युवक संघटना सचिव अमोल शिंगरे, विलास म्हात्रे, आत्माराम कासारे, संतोष दिवकर, अरुणा तांबडे, जयराम गायक, तानाजी म्हात्रे, काशिनाथ मांडलेकर, कमलाकर पाष्टे, नरेश खराडे, परशुराम बोले, हिराजी कांडणेकर, हेमंत शिंगरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version