मोहोपाडा नगरपालिका झाल्यास विकासाला चालना मिळणार

| रसायनी । वार्ताहर |

रसायनी हा औद्योगिक परिसराने वेढलेला भाग आहे. या परिसरात विविध धंदे व कारखाने आहेत. रसायनी पाताळगंगा परिसरातील भविष्यातील गरजा लक्षात घेता मोहोपाडा नगरपालिका अस्तित्वात येणे ही काळाची गरज आहे. या भागातील ग्रामपंचायतीचा ताण कमी होवून महसूल उत्पन्नात मोठी वाढ होईल असे रसायनीकरांचे म्हणणे आहे. रसायनी-पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमुळे अनन्य साधारण आहे. मोहोपाडा-रसायनी हा खालापूर, कर्जत, पेण व पनवेल या चारही तालुक्यांचा मध्यवर्ती भाग असल्याने गेल्या काही वर्षात परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. परंतु अत्यावश्यक सोयी सुविधांची कमतरता असल्याने वासांबे, मोहोपाडा, चांभार्ली, वडगाव, गुळसुंदा, आपटा, सावळे, देवळोली या ग्रामपंचायती मिळून नगरपालिका झाल्यास विकासाला चालना मिळेल असे जाणकारांचे मत आहे.

दरम्यान ग्रामपंचायतींची भौगोलिक रचना तसेच लोकसंख्या पाहता रसायनी नगरपालिका होण्यास कोणतीही अडसर नाही. शिवाय कासप परिसरात सुरू असणारे पन्नासपेक्षा जास्त कारखान्यांचे काम पाहता रसायनी परिसराच्या लोकसंख्येत प्रचंड वाढ होणार आहे. यात वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीची लोकसंख्या जवळपास 64000 हजार आहे. त्यामुळे वाढत्या लोकवस्तीला आवश्यक सोयीसुविधा पुरवताना ग्रामपंचायती कमी पडणार आहेत. मोहोपाडा नगरपालिका झाल्यास त्या परिसराचा कायापालट होवून कोट्यवधीचा महसूल मिळणार आहे.

Exit mobile version