| रोहा | प्रतिनिधी |
रोह्यातील भाटे सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात रविवारी (दि.18) झालेल्या पेन्शनर धारकांची भव्य सभा पार पडली. ज्येष्ठ नागरिक कामगारांच्या ईपीएस 95 पेन्शन वाढीसाठी अशोक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय संघर्ष समिती गेली 9 वर्षे आपल्या हक्कासाठी लढा देत आहे. पेन्शनच्या माध्यमातून वर्षाला सुमारे 58 हजार कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा होतात. त्यापैकी पेन्शनधारक कामगारांना फक्त 13 हजार कोटी रुपये रक्कम वितरित केली जाते. मग 45 हजार कोटी व्याज जाते कोठे? शासनाने कामगारांना आत्ता पर्यंत आश्वासना शिवाय काहीच दिले नाही. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापर्यंत बजेटमध्ये जर कामगारांच्या हक्काच्या पेन्शनमध्ये वाढ दिली नाही तर दिल्लीतील जंतरमंतर येथे राष्ट्रीय स्तरावर भव्य आंदोलन उभारले जाईल असा इशारा संघटक सुभाष पोखरकर यांनी दिला आहे. ज्येष्ठ नागरिक कामगार सरकारकडे भिक मागत नाही. तर हक्काची पेन्शन वाढवून मागत आहोत. त्याचा संबंधित खात्याने त्वरित विचार करावे अशी देखील मागणी पेन्शनधारकांनी केली. यावेळी रोहा अध्यक्ष मालू पांडू धसाडे, सुरेंद्र आगरकर, महादेव धसाडे, वसंत शेलार, नारायण पिंगळे, आत्माराम ठमके, नंदकुमार भादेकर, दिलीपराव कहाणे, इंद्रजित राजपुत आदी सुमारे 650 ज्येष्ठ पेन्शनर बंधू-भगिनी उपस्थित होते.
पेन्शन वाढवून न दिल्यास आंदोलन
