। आगरदांडा । प्रतिनिधी ।
हिंदू-मुस्लिम यांच्यात जातीय सलोखा राहावा व सर्व सण आनंदात साजरे होण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखण्याच्या दृष्टीकोनातून मुरुड पोलीस ठाण्यामार्फत शहरातील अखिल खतिब यांच्या वाडीमध्ये रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलीस निरीक्षक नितीन गवारे, डॉ. राज कल्याणी, विश्वास चव्हाण, आशिलकुमार ठाकूर, उपनिरीक्षक श्रीकांत म्हात्रे, पोलीस नाईक सागर रसाळ, सहाय्यक फौजदार दीपक राऊळ, पोलीस नाईक सुरेश वाघमारे, परेश म्हात्रे, डॉ. निस्सार बिरवाडकर, मंगेश दांडेकर, मुग्धा जोशी, स्नेहा पाटील, वासंती उमरोटकर, अरविंद गायकर, विजय पाटील, नितीन आबुर्ले आदींसह हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुरुड पोलीस ठाण्यामार्फत इफ्तार पार्टीचे आयोजन
