खोपोली | प्रतिनिधी |
सध्या गेल्या काही दिकसातून वातावरणात बदल झाला असून हिवाळा ऋतू असताना कधी ऊन तर कधी पाऊस तर थंडीचे नावाच नाही साऱ्या दिन चाऱ्यामध्ये मानवाला अस्वस्थ करणारे वातावरणात 29 नोव्हेंबर रोजी दुपार पासून सोसायट्या चा वारा आणि दमट वातावरण असल्याने या वाऱ्या मुले विद्युत वाहिन्या एकमेकाला चिटकून पार्क होण्याच्या घटना घडल्याने खालापुर तालुक्यातील धामणी गावात असाच प्रकार घडून विद्युत वाहिन्यांनावर पार्क झालेली ठिणगी गुरांसाठी साठवण करून ठेवलेली पेंडयाचे गंजी व माच जळून खाक झाल्याने येथील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या मालकावर उत्पादन देण्याऱ्या म्हशी ना वैरण देण्याची प्रश्न समोर आल्याने या ठिकाणी आगीत जवळपास 6 हजार पेंडा जळाल्याने जवळपास 3 लाखाचे नुकसान झाले आहे या बाबत विद्युत मंडळाने भरपाई देऊन या दुग्ध व्यवसायिक मालकाला आधार द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे
सर्वत्र ठिकाणी कोरोनाच्या संकट असताना वाटवरणात ही दिवसागणिक बदल होऊन मानवाला अस्वस्थ करणारे वातावरण असल्याने त्याचा प्रकृती वर परिणाम होत आहे त्यातच हिवाळा ऋतू सुरू असताना किरकोळ हिवाळ्याचे वातावरण आहे तर ऊन व पाऊस ही अधुन मधून सुरू आहे 29 नोव्हेंबर रोजी सोसायट्या चा वारा सुटला होता त्यामुळे धामणी गावात उमेश सटूराम चिले हे दुग्ध व्यवसाय करीत असल्याने म्हशी व गायी ना खाण्या पिण्याची व्यवस्था म्हणून 5 रुपये किमतीने एक पेंडा खरेदी करून त्याची गावाच्या विहिरी जवळ जवळपास 6 हजार पेंडया ची गंजी व माच रचून ठेवले असताना सुटलेल्या वाऱ्या मुळे विद्युत वाहिन्या एकमेकांना टच होऊन स्पार्क झाल्याने ठिणगी उडून गंजी ला आग लागली आणि आगीचा भडका वाढतच गेल्याने तात्काळ पाण्याच्या साह्याने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र पेंडया माच रचलेली लाकडी खांब असल्याने आगी वाढतच गेली आणि जवळपास 6 हजार विकत घेऊन म्हशी गाई साठी वैरण साठवून ठेवलेले जळून खाक झाले त्यामुळे उमेश चिले कुटुंबाचे दुग्ध व्यवसाय अडचणीत आले असून गायी म्हशी ना वैरण कसे पुरवायचे हा प्रश्न उभा राहिला आहे त्यामुळे विद्युत मंडळाकडून भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातून होत आहे
धामणी येथील अनेक कुटुंब दुग्ध व्यवसाय करीत असून अशा प्रकारे गुरांसाठी वैरणाची तजबीज करून गंजी व माच रचून ठेवले आहे मात्र गावाजवळूनच कारखान्यासाठी विद्युत लाईन गेल्याने त्याच्या मुले वारा सुटल्यानंतर स्पार्क होऊन ठिणग्या उडण्याचे प्रकार होत आहे या प्रकारामुळे पेंडयाचा माच व गंजी जळाली असल्याने सदरच्या विद्युत लाईन मुले आग लागल्याने जवळपास 3 लाखाचे नुकसान झाले आहे त्यामुळे गायी म्हशी ना वैरणा गंभीर प्रश्न समोर आहे
उमेश चिले – दुग्ध व्यवसायिक मालक
