रेवदंड्यात अवैध धंद्यांना ऊत

मटका खुलेआम, तर गुटखा विक्रीसुद्धा बिनधास्त

| रेवदंडा | वार्ताहर |

रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना ऊत आला असल्याने स्थानिक महिलांमधून तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, बेकायदेशीर मटका खुलेआम सुरू असनू, गुटखा विक्रीसुद्धा बिनधास्त असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

रेवदंडा व परिसरात बेकायदेशीर मटका सुरू असून, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून भररस्त्यात मटका एजंट व्यवसाय साधून आडमार्गाला उभे राहून घेतलेल्या मटक्याचे आकडे भ्रमणध्वनीद्वारेच मटका मालकांना पाठवित आहेत. एकदंरीत, भ्रमणध्वनीने मटका व्यवसायपूर्वीपेक्षा तेजीत आला असून, खुलेआमपणे रस्त्यात उभे राहून एजंट मटका व्यवसाय चालवीत आहेत, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मटका खेळून झटपट श्रीमंत होण्याच्या नादाने अनेक युवावर्ग वाममार्गाला लागले असल्याचे चित्र आहे. महिना व दिवसभरातील आर्थिक उत्पन्नाचा भाग मटका खेळून घालवीत असल्याने महिलावर्ग संप्तत प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. सदर मटका व्यवसाय पूर्णतः बंद करावेत, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

गुटखा विक्रीस पूर्णतः बंदी असतानासुद्धा रेवदंडा व परिसरात बेकायदेशीपणे गुटखा विक्री केली जात आहे. गुटखाच्या मागणीसाठी गुटखा खाणारे गुटखा विक्रेत्याच्या घरी सुध्दा रात्रीचे समयी खरेदी करत असतात. रेवदंडा व परिसरात खुलेआम मटका तसेच सर्रास गुटखा विक्री बिनधास्त सुरू आहे, अशी माहिती स्थाकि महिलांनी दिली. दरम्यान, या बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांचा वचक केव्हा बसेल, असा प्रश्‍न महिला उपस्थित करत आहेत.

Exit mobile version