गावठी दारूच्या विक्रीसह अवैध धंदे तेजीत

| सुकेळी | वार्ताहर |

नागोठणे विभागातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या विक्रीसह गुटखा, गांजा विक्री तसेच अवैधरित्या जागेत भंगारवाल्यांचा सुळसुळाट जोरात सुरू आहे. वारंवार वृत्तपत्रात बातमी देऊनसुद्धा याबाबतीत स्थानिक पोनरस दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरीक व विशेषतः महिलावर्गांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत.

सद्यःपरिस्थितीत नागोठणे परिसरातील सुकेळी, वाकण, वरवठणे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गावठी दारुची विक्री तसेच गुटखा, गांजा यांसह भंगारवाल्यांचा सुळसुळाट तेजीत सुरू आहे. सुकेळी विभागामध्ये दिवसाढवळ्या गावठी दारुची विक्री ही नेहमीच जोशात सुरू असते. तर काही ठिकाणी गांजा व गुटखा विक्री हीसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

नागोठणे ते कोलाड या दरम्यानच्या अंतरामध्ये अनेक भंगारवाले ठाण मांडून बसले आहेत. यांच्यावर कोणाचाही दरारा राहिला नसल्यामुळे भंगारवाल्यांचे चांगळेच फावत आहे. यातील एक उदाहरण म्हणजे महामार्गावरील वाकण पुलाजवळ अंबा नदीच्या किनारी एका भंगाराच्या गोदामातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या वस्तू व केबल वायर रात्रीच्या वेळेत जाळण्यात येतात. त्यामुळे अक्षरशः धुराचे लोटच्या लोट निघत असल्यामुळे सर्वच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदुषण पसरत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या सर्वच बाबतीत येथील स्थानिक पोलीस कारवाई करतील का, असा प्रश्‍न विभागातील नागरिकांसमोर पडला आहे.

Exit mobile version