नदी पात्रात बेकायदेशीर बांधकाम

प्रशासनाच्या कारवाईकडे सार्‍यांचे लक्ष
| सुधागड पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यामध्ये नदी पात्रातील अनेक ठिकाणी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून नदीपात्रामध्ये बेकायदेशीर बांधकामे करण्यात आली आहेत. संबंधित विभागाची कोणतीही परवानगी न तसेच नियम धाब्यावर बसवून नदीपात्रातच बांधकाम सुरू आहे. नदीपात्रातील बांधकामामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडविण्याचे काम संबधितांकडून केले जात असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी दत्तात्रय दळवी यांनी अनेक वेळा संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना वेळोवेळी दिली आहे. मात्र, अद्याप याकडे कारवाई करण्यात आललेली नाही.

या बांधकामाला प्रशासनाची मूक संमती आहे, की नदीपात्र प्रशासनाने बांधकाम करणार्‍याला आंदण दिले आहे, हा प्रश्‍न उपस्थित होतो. या अतिक्रमणाकडे तलाठी व मंडळ अधिकारी का दुर्लक्ष करताहेत, हा एक न सुटणारा प्रश्‍नच आहे. तरी, या अनधिकृत बांधकामावर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण सुधागड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version