| उरण | प्रतिनिधी |
कोकण समुद्रकिनारी वसलेल्या उरण, रायगड, मुंबई समुद्र परिसरातील ठिकठिकाणी पावसाळी बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी सुरू आहे. मागील सात दिवसांत पाच मच्छीमार बोटी ताब्यात घेऊन काही बोटींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
खोल समुद्रातील मासेमारीसाठी बंदीचे आदेश असतानाही आदेशाचे उल्लंघन करून उरण-मुंबई-रायगड समुद्र परिसरातील काही मच्छीमार नौका ठिकठिकाणी अवैधरित्या मासेमारी करीत असल्याचे आढळून आले आहे. मनुष्यबळ अपुरे असतानाही मत्स्य व्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांकडून बंदी काळात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बोटींवर कडक कारवाई केली जात आहे. बंदी काळात 1 ते 7 जुन दरम्यान मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांनी अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या जय गौरी नंदन, एकवीरा माता, श्री जागृत गौराई, भवानी जगदंबा, देवाची आळंदी आदी पाच मच्छीमार बोटी ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई केली आहे. यापैकी एका बोटींकडून 1 लाख 30 हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
बंदी काळातही अवैधरित्या मासेमारी
