12 बोटींवर मत्स्य विभागाची कारवाई
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण-मुंबई-रायगड समुद्र परिसरातील ठिकठिकाणी अवैधरित्या मासेमारी करणार्या मागील आठवडाभरात आणखी 12 मच्छिमार बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. याआधीच मागील महिनाभरात 21 मासेमारी बोटींवर कारवाई करण्यात आली असून, कारवाई केलेल्या मच्छिमार बोटींची संख्या 33 वर पोहोचली असल्याची माहिती उरण सहाय्यक मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी प्रियांका भोय यांनी दिली.
खोल समुद्रातील मासेमारीसाठी बंदीचे आदेश असतानाही आदेशाचे उल्लंघन करून उरण-मुंबई-रायगड समुद्र परिसरातील ठिकठिकाणी अवैधरित्या मासेमारी करणार्या मागील 30 दिवसांत एकूण 21 मासेमारी बोटींवर कारवाई करण्यात आली होती. कारवाईनंतरही बंदी काळात बेकायदेशीर मासेमारी सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे अवैधरित्या मासेमारी करणार्या आणखी 12 मच्छीमार बोटींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती भोय यांनी दिली.
कारवाई केलेल्या बोटींची नावे
मॉ तुळजाभवानी, खंडोबा भवानी, भोळा कनकेश्वर, रुद्रा, श्री सदगुरू कृपा, विठ्ठल माऊली, दत माऊली कृपा, साई तिसाई, श्री समर्थ कृपा, श्री साई चिंतामणी, श्री साई मोरेश्वर, सागर लक्ष्मी एकवीरा आई.