। रसायनी । वार्ताहर ।
रसायनीत स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनी पोमण व पथकाला एक व्यक्ती मोटरसायकलवर अवैधरीत्या बेकायदेशीर गावठी दारूची खारपाडा ते रसायनी अशी वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली होती. लगेचच रसायनी येथील कराडे गावात पोलिसांनी सापळा लावला. यावेळी आरोपी संतोष बाबुराव घरत रा.खारपाडा-पेण हा मोटारसायकलवरुन गावठी दारू घेउन येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 50 लिटर म्हणजेच 6 हजार रु. किंमतीची गावठी हातभट्टीची दारू व किंमत 50 हजार रु. किंमतीची बजाज डिस्कवर मोटरसायकल असा एकूण 56 हजार रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला. हा जप्त केलेला मुद्देमाल व आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याकरिता रसायनी पोलीस ठाणे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. ही कार्यवाही सपोनी पोमन, ए.एस.आय राजेश पाटील, प्रसाद पाटील, एच.सी.संदीप पाटील, राकेश म्हात्रे, सुधीर मोरे, यशवंत जेमसे यांनी केली.