रोह्यात अवैध मटका राजरोसपणे सुरू

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांचा संताप

। चणेरा । प्रतिनिधी ।

गेल्या काही महिन्यांपासून रोहा शहरात अवैध मटाक जुगार राजरोसपणे सुरू झाले आहेत. या मटका जुगारामुळे अनेकांच्या संस्कारांची राखरांगोळी झाली आहे. अनेक अल्पवयीन मुले या वाम मार्गाला गेलेली आहेत. तर, काहींनी जुगारापोटी जीव गमावला असल्याच्या धक्कादायक घटना समोर आलेल्या आहेत.

मटका जुगारात गुंतवणूक कमी, नफा जास्त या मानसिकतेतून अनेक तरुण पिढीचा या धंद्याकडे कल दिसून येत आहे. युवकांचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून होणार्‍या दुर्लक्षामुळे मटका जुगार धंद्याला मोकळे रान मिळाले आहे. तसेच, जे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत या धंद्याना जणु रोहा पोलीसांनी मटका जुगाराला नाहरकत दिली आहे का, असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडलेला आहे. युवक या आकडेवारीच्या खेळापोटी तासनतास वाया घालवत आहे. त्यामुळे युवक कर्जबाजारी व नशेच्या आहारी जाण्याचे प्रमाण वढले आहे. या अवैध धंद्यांमुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. या अवैध धद्यांबाबत आरडाओरडा झाल्यास तात्पुरते धंदे बंद ठेवले जातात व परिणामी छुप्या पद्धतीने धंदे चालविले जातात. आणि पुन्हा काही दिवसांनंतर परिस्थिती जैसे थे असते. आता तरी पोलिस प्रशासन या अवैध धंद्यावर कारवाई करणार का, असा संतप्त सवाल नागरिकांमधून होत आहे.

Exit mobile version