म्हसळा-दिघी मार्गावर बेकायदेशीर रिक्षा स्टॅन्ड

कारवाई करण्याची मागणी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

म्हसळा ते दिघी मार्गावर बेकायदेशीर रिक्षा स्टॅन्ड सुरु करण्यात आल्याने त्याचा त्रास वाहनचालकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. आरटीओ अधिकारी यांनी या बेकायदेशीर रिक्षा स्टॅन्डवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी केली आहे.

आरटीओ अधिकार्‍यांनी अशा बेकायदेशीर रिक्षा स्टॅन्डना परवानगी दिलीच कशी, अशी विचारणाही त्यांनी केली आहे. यासाठी तातडीने कार्यवाही करुन हा रस्ता वाहनांसाठी मोकळा ठेवावा,अशी मागणीही त्यांनी केली.

अलिबाग-वडखळ रस्त्याचे काय
अलिबाग-वडखळ रस्त्याच्या दुरवस्थेबाबतही पंडित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सातत्याने तक्रारी करुनही प्रशासन त्याकडे का लक्ष देत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना, वाहनचालकांना होत आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम सुरु आहे. खराब रस्त्याचा त्रास पर्यटकांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.

Exit mobile version