साथीच्या आजाराने उरणकरांना ग्रासले

सरकारी, खाजगी रुग्णालये हाऊसफुल्ल
| जेएनपीटी | वार्ताहर |
उरण तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील रहिवाशांना सध्या सर्दी, खोकला, घसा दुखी आणि ताप या आजारांनी ग्रासले आहे.त्यामुळे सदर आजारांवर उपचार करून घेण्यासाठी रुग्णालये हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. हवेत वाढणारा गारवा आणि सातत्याने हवेत होणारा बदल यामुळे उरण तालुक्यातील शहरी भागात व ग्रामीण भागातील रहिवाशांना सध्या सर्दी, खोकला, घसा दुखी आणि ताप यासारख्या आजारांनी ग्रासले आहे.त्यामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गर्दी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.त्यात सध्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने रहिवाशी भिंतीच्या सावटाखाली वावरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.


डॉक्टर प्रकाश मेहता यांनी माहिती देताना सांगितले की सध्या कोरोनाच्या संकटात सापडले रहिवाशी स्वतःला आपल्या कुटुंबाला सावरण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रयत्न करत आहेत.त्यात सध्या हवामानातील बदलामुळे आणि वाढत्या गारव्यामुळे रहिवाशांना सर्दी, खोकला, घसा दुखी आणि ताप यासारख्या आजारांचा सामना करावा लागत आहे.तरी रहिवाशांनी घाबरून न जाता आपले परिसर स्वच्छ ठेवून घरातील पाणी उकळून घ्यावे,तेलकट पदार्थ खाणे टाळावे तसेच घाबरून न जाता आप आपल्या परिसरातील डॉक्टरांच्या सल्ल्याने सदर आजारांवर उपचार करून घ्यावेत.

Exit mobile version