पनवेलच्या ओरियन मॉलमध्ये इंडिया गेटची प्रतिमा

। पनवेल । वार्ताहर ।

दरवर्षी स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने पनवेलमध्ये देशप्रेम जागृत करण्याच्यादृष्टीने विविध उपक्रम तसेच कलाकृती उभारल्या जात असतात. यावर्षीदेखील पनवेलमधील ओरायन मॉलमध्ये इंडिया गेटची हुबेहूब कलाकृती उभारण्यात आली आहे.

नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी दरवर्षी ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, मनन परुळेकर, दिलीप करेलिया विविध उपक्रम राबवत असतात. यावर्षी पनवेलमधील ओरायन मॉलमध्ये इंडिया गेटची हुबेहूब कलाकृती उभारण्यात आली आहे. राष्ट्रध्वजाच्या तीन रंगाची छटादेखील या कलाकृतीवर उमटविण्यात आली आहे. या इंडिया गेटवर राफेलसारखी युद्ध विमाने घिरट्या घालत असल्याचे या देखाव्यात दाखविण्यात आले असून शासनाच्या घर घर तिरंगा उपक्रमाचे प्रचारदेखील याठिकाणी करण्यात येत आहे. यावेळी पनवेल महानगरपालिकेच्यावतीने काही विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करीत घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले. यापूर्वी ओरियन मॉलच्यावतीने आयएनएस विक्रांत या युद्धनौकेची प्रतिमादेखील उभारण्यात आली होती. या सुंदर कलाकृतीची दखल घेत शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्यावतीने थेट मंत्रालयात विक्रांतच्या कलाकृतीचे प्रदर्शन भरवले होते. स्वातंत्र दिनानिमित्त उभारलेले इंडिया गेटची कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांनी मॉलला भेट देण्याचे आवाहन मंगेश परुळेकर यांनी केले आहे.

Exit mobile version