मागणी केल्यास तात्काळ पाणीपुरवठा; सिडको व्यवस्थापनाचे आश्‍वासन

| अलिबाग | वार्ताहर |
खारघर आणि तळोजा नोडमध्ये पाणी पुरवठ्यासंबंधी तक्रारी नोंदविण्यासाठी आणि टँकरची मागणी करण्यासाठी नागरिकांनी 9324950948 या क्रमांकावर कॉल करून किंवा व्हॉट्सअ‍ॅप संदेशद्वारे किंवा एसएमएसद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.

दक्षिण नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क, नैना शहर, महागृहनिर्माण योजना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे दक्षिण नवी मुंबईतील खारघर आणि तळोजा नोडला नागरिकांकडून वास्तव्यासाठी सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर या परिसरातील पाण्याची मागणीही वाढत आहे. सद्यःस्थितीत सिडकोकडून हेटवणे पाणीपुरवठा योजनेसह नवी मुंबई महानगरापालिका, एमआयडीसी यांच्यामार्फत पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु या परिसरातील सन 2050 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून सिडकोकडून आतापासूनच वाढीव पाणी पुरवठ्यासाठी विविध उपायोजनांचा अवलंब केला जात आहे. यासाठी सिडकोकडून विविध लघुकालीन व दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत.

Exit mobile version