रायगड होतोय लसवंत

Coronavirus Vaccine bottle Corona Virus COVID-19 Covid vaccines panoramic bottles

 24 लाख 65 हजार 285 डोस
अलिबाग | भारत रांजणकर |
रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 24 लाख 65 हजार 285 कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस लाभार्थ्यांना देण्यात आले असून, यामधील 7 लाख 58 हजार 73 लाभार्थ्यांना लसीचे दोनही डोस म्हणजे 14 लाख 11 हजार 746 डोस देण्यात आले आहेत. तर 10 लाख 53 हजार 539 लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लस उपयुक्त असून, सर्व पात्र नागरिकांनी लसीचे दोनही डोस घ्यावेत.
डॉ. किरण पाटील,सीईओ,रायगड
जानेवारी महिन्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर फ्रंट लाईन वर्कर्स, 60 वर्षांवरील नागरिक तसेच 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यांनतर 45 वर्षांवरील व त्यानंतर 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण हाती घेण्यात आले आहे.
569 लसीकरण केंद्रे
रायगड जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी 569 लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच त्यांच्या अखत्यारीतील उपकेंद्रांमध्ये 245 लसीकरण केंद्र सुरू आहेत. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये यांच्या अखत्यारीत 28 तर पनवेल महानगर पालिकेच्या अखत्यारीत 28, तसेच खासगी 268 लसीकरण केंद्रे सुरू आहेत.
जिल्हा परिषदेची बाजी
जिल्ह्यात अत्तापर्यंत लाभार्थ्यांना 24 लाख 65 हजार 285 लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या अखत्यारीत असलेल्या निवडक उपकेंद्रांवर सुमारे 10 लाख 69 हजार 259 लसीचे डोस लाभार्थ्यांना देण्यात आले. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रांवर 3 लाख 91 हजार 20 तर पनवेल महानगर पालिकेच्या केंद्रांवर 5 लाख 49 हजार 290 तर खासगी लसीकरण केंद्रांवर 4 लाख 79 हजार 42 लसीचे डोस लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत.
दृष्टिक्षेपात मोहीम
लसीकरण केंद्रे : 569
एकूण लसीकरण : 24 लाख 65 हजार 285
दोनही डोस घेतलेले लाभार्थी : 7 लाख 5 हजार 873
केवळ एक डोस घेतलेले लाभार्थी : 10 लाख 53 हजार 539

Exit mobile version