। मुंबई । वृत्तसंस्था ।
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात असून, लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत.
लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. त्यांचा आवाज अनेक दशकांपासून लोकप्रिय आहे. त्यांचा आवाज नेहमी अजरामर राहील. त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना आहेत. – राहुल गांधी, काँग्रेसचे नेते