खंडीत वीजपुरवठ्यामुळे सीसीटीव्हीवर परिणाम

उरण तालुक्यातील नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर

| उरण | प्रतिनिधी ।

नवी मुंबई पोलीस व सिडकोच्या माध्यमातून उरण तालुक्यातील घटनांवर नजर ठेवण्यासाठी बारा ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र या कॅमेर्‍यासाठी लागणारा अखंडीत वीज पुरवठा महावितरण कंपनीकडून होत नसल्याने अनेकदा उरणमधील घटनांची माहिती पोलिसांना मिळत नाही. त्यामुळे महावितरणने नियमित वीज पुरवठा करावा, अशी अपेक्षा नवी मुंबई पोलिसांकडून केली जात आहे.

तालुक्यातील वाढते औद्योगिक व नागरीकरण यामुळे येथील नागरिकांची सुरक्षा ही ऐरणीवर आली आहे. त्यामुळे तालुक्यात घडणार्‍या घटनांवर नजर ठेवण्यासाठी सिडको मदतीने नवी मुंबई पोलीसांनी उरण मधील शहर तसेच तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यांचे नियंत्रण पोलिसांकडून केले जात आहे. मात्र त्यासाठी अखंडीत वीज पुरवठा आवश्यक आहे. त्यामुळे उरणमधील वीज वितरण नियमितपणे करण्याची अपेक्षा पोलिसांनी केली आहे.

सर्व सीसीटीव्ही हे पथदिव्यावर बसविण्यात आले आहेत. त्यामुळे महावितरणकडून पथदिवे बंद न करताच काम केले जात असल्याने वीज खंडीत होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

विजय सोनावले
उरण महावितरण अतिरिक्त कार्यकारी अभियंता
Exit mobile version