बंद ट्रकमुळे वाहतुकीवर परिणाम

सात तासाच्या परिश्रमानंतर वाहतूक सुरळीत

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग – कुरुळ मार्गावर रविवारी सकाळी अचानक एक ट्रक बंद पडला होता. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोंडी झाली होती. सात तासाच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर ट्रकची दुरुस्ती केल्यावर वाहतूक दोन्ही मार्गावरील पुर्ववत सुरु झाली.

सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक ट्रक अलिबागकडून कुरुळकडे जात असताना आरसीएफ वसाहतीनजीक वळणावर तो तेथील खड्ड्यात आदळून बंद पडला. ट्रकच्या एक्सलमध्ये बिघाड झाल्याने ट्रक बंद झाला होता. यामुळे अलिबाग – रोहा – अलिबाग मुरुड – रेवदंडा व मुरुडकडून मुंबई, ठाणेकडे जाणाऱ्या वाहनांना फटका बसला. कित्येक तास वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांचेे प्रचंड हाल झाले. वाहतूक केोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार रुपेश शिर्के, अमित साळुंखे, स्वप्नील थळे व अलिबाग पोलीस ठाण्यातील बीट मार्शल पथकाने शर्तीचे प्रयत्न केले. एकेरी वाहतूक सुरु करून पर्याय म्हणून अलिबागहून वाहने वळविण्यात आली. सात तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर वाहतूक करण्यास वाहतूक पोलिसांना यश आले.

Exit mobile version