। नवी मुंबई । वार्ताहर ।
सायन-पनवेल महामार्गावर कोपरागावाजवळ आज सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ऐन सकाळी सकाळी ही वाहतूक कोंडी झाल्याने मुंबईबाहेर जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
सायन पनवेल महामार्गावरुन पनवेलच्या दिशेनं हा ट्रक चालला होता. मात्र क्षमतेपेक्षा जास्त सामान ट्रकमध्ये भरण्यात आले होते त्यामुळे हा ट्रक हायवेवरच उलटला. या अपघातामुळे ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळात आहे. सुदैवानं ट्रक पलटी होऊन कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. पलटी ट्रकला हटविण्यात यश आले आहे. 2 टोविंग व्हॅनच्या मदतीने ट्रकला हटविण्यात आले आहे
.
या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र वाहनांची मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी असलेली संख्या जास्त असल्यानं वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. मुंबई ठाण्याहून पनवेलच्या दिशेने निघालेल्या वाहनांचा खोळंबा ट्रकच्या अपघातामुळे झाल्याचे चित्र पाहायला मिळात आहे.
तब्बल तीन ते चार किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा सायन पनवेल महामार्गावर लागल्या होत्या. दरम्यान, सायन पनवेल महामार्गवर पलटी झालेला ट्रक हटवण्यात आला आहे. क्रेनच्या साहाय्याने पोलिसांनी पलटी झालेला ट्रक हटवला आहे. मात्र तरी देखील या मार्गावरची वाहतूक संत गतीने सुरु होती. मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी निघालेल्यांना या अपघातामुळे मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.