। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील आंबेवाडी आदिवासीवाडी येथे मामानेच आपल्या भाचीसोबत सातत्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. कर्जत तालुक्यात १ नोव्हेंबर २०२१ ते २६ मे २०२२ यादरम्यान पोटलपाली, आंबेवाडी आदीवासीवाडी व वेणगाव येथील विट भट्टीवरील झोपडीमध्ये मामानेच आपल्या १२ वर्षीय भाचीसोबत सातत्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत तिला गरोदर केली. त्यांनतर ६ मे २०२२ रोजी तिला कर्जत रेल्वे स्टेशनवरून भिवपुरी येथे नेत रात्रीच्या वेळी भान्सुलीवाडीच्या शेतामध्ये पुन्हा तिच्यावर बळजबरी करत झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास तिला हाताबुक्यांनी मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत कर्जत पोलीस ठाणेयेथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास मा.पोनि सुवर्णा पत्की या करीत आहेत.