मुख्याधिकार्यांच्या मुख्याध्यापकांना सूचना
| खोपोली | वार्ताहर |
सर्व प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची शाळांचे पट वाढविण्याच्या अनुषंगाने सर्व प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पटसंख्या वाढवण्यासाठी विविध उपाययोजना राबवाव्यात, अशी सूचना खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंंकज पाटील यांनी नगरपरिषदेंतर्गत येणार्या सर्व प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना केल्या आहेत.
दरम्यान, खोपोली नगरपरिषद प्राथमिक विभागाच्या 15 शाळा असून, त्यामध्ये मराठी माध्यमाच्या 12, उर्दु माध्यमाच्या 2 आणि हिंदि माध्यमाची 1 शाळा आहे. सदर शाळांमध्ये सद्यःस्थितीत 1892 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या बैठकीमध्ये मुख्याधिकार्यांनी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये सर्व शाळांचे पट वाढविण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगानेदेखील उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या. शाळांतील प्रत्येक वर्ग डिजिटल करणे, शाळेत रेन हार्वेस्टींग सिस्टीम राबविणे, शाळेत सोलर सिस्टीम बसविणे, शाळा परिसरात झाडे लावणे, तसेच विद्यार्थ्यांना आहाराबाबत माहिती देण्याबाबतही सूचना केल्या. या बैठकीस शिक्षण विभागाचे मुख्य लिपीक निशिकांत सुर्वे व केंद्र व्यवस्थापक लियाकत पठाण उपस्थित होते.
